Jul 8, 2009
प्रिय मधू गानू- विजय तेंडुलकर
प्रिय मधू गानू,
तर तुम्ही पंचाहत्तर वर्षांचे झालात.
हे मी इतरांसाठी लिहीत नसून माझ्यासाठीच लिहीत आहे.
तुमच्या वयाचे भान मलाच ठेवण्याची गरज आहे. कारण, तुम्ही ते कधीच मला दिले नाही आणि देणार नाही.
दोनच अपवाद.
एक : तुम्ही रंगवून काळी न केलेली तुमची शुभ्र दाढी.
दोन : पुण्यापासून अंतरावरच्या एका वृद्धाश्रमात तुम्ही जागा घेतली असून तिथे तुम्ही आणि मीनाक्षी यानंतर रहायला जाणार असल्याचे तुम्ही तुमच्या मित्रांना सांगत असता. प्रत्यक्षात ते केव्हा घडते? त्याची वाट तुमचे मित्र पाहत आहेत आणि तसे कधी घडेल यावर कुणी कुणी पैजाही लावल्या आहेत. दरम्यान, आठवडयातून कधी इथे तर कधी तिथे अशा फेऱ्या सुरु करून तुम्ही वृद्धाश्रमाचे तुमच्या धावत्या दौऱ्यांसाठी आणखी एक ठिकाण करून, वृद्धाश्रम ते घर, असे नवे धावते दौरे सुरू केले आहेत आणि त्याची मजा तुम्ही 'अभी तो मै जवान हूं' थाटात घेत असता.
याचा अर्थ वृद्धाश्रम हाही तुमच्या वयाचा खरा पुरावा अद्याप तरी नाही.
दाढी हीच खरी.
तर, अगदी बिनचूक बोलायचे तर तुमची दाढी पंचाहत्तर वर्षांची झाली. तुम्ही अजून चोविशीत आहात, असे तुमच्या मित्रांना दिसते. आदल्या जन्मात तुम्ही रेल्वेचे इंजिन असावेत, असे माझ्या मनात क्वचित येऊन गेले आहे.
तुमचा कुठून तरी कुठे तरी जाण्याचा उत्साह मी गेली चाळीस वर्षे (म्हणजे माझ्या वयाची, तुमच्या नव्हे) तरी पाहात आहे. मात्र, कोणतेही रेल्वे इंजिन चाळीस वर्षे एकाच वेगाने विनाविश्रांती धावत राहिल्याची माहिती मला तरी नाही.
अधिक उजवी उपमा द्यायची तर वाऱ्याची देता येईल. तो न थकता सर्व वेळ सर्वत्र वाहत असतो. तुम्हीही न कंटाळता आणि न थकता वाहत असता. कधी पुणे ते मुंबई, कधी पुणे ते कोकणातले कोणतेही गाव, कधी कोल्हापूर, कधी सांगली, कधी सावंतवाडी तर कधी सोलापूर असे तुमचे पोहोचण्याचे ठिकाण जरी बदलले, तरी तुमच्या उत्साहात फरक पडत नाही. कारण ते ठिकाण हे तुमचे खरे उद्दिष्ट नसतेच. तो तुमचा 'भोज्जा' असतो. त्या भोज्ज्याशी पोचलात की काही मिनिटांत तुम्ही परत मूळ ठिकाणी निघण्यासाठी आधी मनाने आणि मग देहाने नव्या उत्साहाने तयार होता. असे भोज्जे ठरवून तुम्ही महाराष्ट्राच्या नकाशावर उभी आडवी शिवाशिवी किंवा पकडापकडी खेळता आणि तुम्ही तुम्हालाच पकडण्याठी धावता असे कधी कधी वाटते. पुन्हा, या 'चर' अवस्थेत तुम्ही ताकद खर्च करण्याऐवजी जमा करीत जाता आणि पोचेपर्यंत तुमच्याकडे परत मूळ ठिकाणी पोचण्याएवढी ती जमा झालेली असते. इतकेच नव्हे तर परत पोचल्यावर नव्या प्रवासासाठी निघायचे म्हटले, तरी तुम्ही तितक्याच उत्साहाने तयार असता.
हा उत्साह कोठून येतो? हे तुमच्या मित्रांना गूढ आहे.
वर्षानुवर्षे 'वाहून' देखील तुमचा याविषयीचा उत्साह ओसरत कसा नाही हे आम्हाला कळत नाही.
त्याअर्थी, तुम्ही वारा नसलात तरी वाऱ्याचे नातलग असलाच पाहिजेत. वारा अशरीरी आहे. त्याला शरीर नसल्याने तो थकण्याचा प्रश्न नाही. पण तुम्ही तर सदेह आहात. देहाला वय असते. तो जुना होतो. नादुरूस्त होतो. थकतो. तुमच्या देहाला हे माहीत नसल्यासारखा तो गेली कित्येक वर्षे तुमच्याबरोबर सर्वभर भटकतो आहे.
हे झाले तुमच्या गतीमानतेबद्दल.
या 'चर' अवस्थेत तुम्ही माणसे जोडता. जोडलेल्यांना पुन्हा भेटता. स्थलकालाने मध्यंतरी पकडलेले अंतर काटून ही रक्तापलीकडली नाती घट्ट करीत असता. जिकडे जाल तिकडे महाराष्ट्रात तुमच्या ओळखी आहेत. तुमच्यावर प्रेम करणारी, तुम्ही यावेत, रहावेत असे वाटणारी माणसे सर्वभर आहेत. ती तुमची वाट बघत असतात. या लोभापायीच असेल कदाचित, पण तुम्हीही क्वचित भोज्जाला शिवून लगेच परत निघण्याची ओढ थोडी तहकूब ठेवून, दोन-चार दिवस एखाद्या गावी, एखाद्या घरी राहता. कदाचित, याला तुमची सहधर्मचारी किंवा अशा दौऱ्यांत बरोबर घेतलेले दोस्तही कारणीभूत असतील. पण राहिलात तरी तुम्ही 'अचर' क्वचितच असता. गावातल्या गावात तुमची भटकंती, ठिकाणे बघणे, कारण शोधून कुठे तरी जाऊन येणे, नवी माणसे जोडणे चालूच असते. मला तर वाटते की, मुक्कामाच्या घरी देखील तुम्ही या खोलीतून त्या खोलीत किंवा या घरातून त्या घरात आणि यातले काही शक्य नसेल तेव्हा मनातल्या मनात जागच्या जागी फिरत असाल. गती हा तुमचा स्वभाव आहे. स्थिर राहणे तुमच्या मनाला मान्य नाही. (झोपेत तरी तुम्ही पूर्णतया बिछान्यातच असता की, स्वप्नात कुठे कुठे जात असता?)
पण असेही दिवस असतात, जेव्हा तुम्ही तुमच्याच घरी असता. म्हणजे जाऊन येऊन असे म्हणू या. तात्पुरती बाहेरगावी नाही तरी गावात, पुण्यात तुमची भ्रमंती चालू असतेच. अगदी घरीही तुम्ही गतीमान्! माणसांची वर्दळ सदैव तुमच्याकडे चालू. माणसे दारातून येतात, तशी खिडकीतून तुमच्याशी संवाद साधतात. दर दोन मिनिटांनी एक या वेगाने फोन येत असतात. एका वेळी दारात, खिडकीत आणि फोनवर माणसे तुमच्याशी बोलताहेत असेही दृश्य दुर्मीळ नसते. एखाद्या मंत्र्याने असूयेने जळावे असा तुमचा जनसंपर्क. हल्लीचे मंत्री स्वत:चीच कामे जास्त करतात, तुम्ही मंत्री नसून इतरांची कामे करता आणि ती आपलीच असल्यासारखी. इतरांच्या कामापायी तुम्हाला सर्व प्रकारची तोशिस पडते. एकेकदा जेवायला उसंत नसते. असेही म्हटले तर चुकणार नाही की, इतरांच्या कामांच्या चिंतांत तुम्ही स्वत:चा आणि पत्नी मीनाक्षीचा विचारदेखील विसरलेले असता. माणसे तुमच्या दारातून रिकाम्या पोटी कधीच परतत नाहीत. प्रत्येकाचा दिलखुलास पाहुणचार झालाच पाहिजे असा तुमचा आग्रह असतो. (त्याचबरोबर कुणाकडे गेले असता कारणाशिवाय चहासाठी थांबायचे नाही - कार्यबाहुल्याचे खरे कारण असतेच. - हाही आग्रह. माझाच प्रदीर्घ अनुभव.) यामुळे घरीच असता तेव्हाही तुम्ही प्रवासात असल्यासारखे धावपळीत असता. याउलट, तुमच्याकडे आलेले स्वत:च्या घरी असावेत तसे निवांत. तसे त्यांनी असावे असा तुमचा प्रयत्न असतो. त्यांना घरी स्थिर करून तुम्ही चपला चढवून दोन-चार कामे करुन आलात, असेही दिसते.
तुमच्या व्यक्तिगत जगातली माणसे कोणत्याही एका प्रकारची, स्तरातली, जातीची किंवा व्यवसायातली म्हणता येणार नाहीत. यात रिक्षावाला येतो आणि संपादकही येतो. शिक्षक येतो तसा शेतकरीही येतो. निकषच शोधायचा तर तुम्हाला अकृत्रिम स्नेहाची ओढ आहे. तोंडापुरते प्रेम, कामापुरते अगत्य आणि खोटेपणा तुम्हाला चालत नाही. तुम्ही मनापासून आणि हातचे न राखता प्रेम देता आणि तसेच तुम्हाला मिळावे अशी तुमची अपेक्षा असते. कोणीतरी जातीवादी माझ्याकडे म्हणाला होता की, गानू कोकणस्थ असून वृत्तीने देशस्थ आहेत; ते तुमच्या या वृत्तीला उद्देशून असावे. देशस्थ दिलदार असतात आणि कोकणस्थ कंजूष, असा प्रवाद या समाजामागे आहे. कंजूष देशस्थ आणि तुमच्यासारखे उदार कोकणस्थ मला भेटले आहेत, हे इथे नमूद केले पाहिजे. माणसांचेच तुम्ही लोभी. परंतु, लेखक, संपादक, गायक आणि नट यांना तुमच्या व्यक्तिगत जगात विशेष पसंती आणि सवलती. नट मित्रांची नाटके, चित्रपट आणि सीरियल तुम्ही आठवणीने आणि आवर्जून बघणार. गायक मित्रांच्या बैठकांना आणि मित्र वक्त्यांच्या भाषणांना तुम्ही आग्रहाने जाणार, पुढची जागा पकडून बसणार आणि भरपूर उत्तेजनपर माना डोलावणार. यातले काही विशेष आवडले, तर ते इतरांनी बघावे आणि ऐकावे म्हणून स्वत: त्याचे प्रयोग लावणार आणि घरचे कार्य असावे तसे त्यासाठी खपणार. संपादक मित्र आहे, या कारणाने तुम्ही त्याचे वर्तमानपत्र बदलले (ही अलीकडली पोलीस खात्यातली आणि वर्तमानपत्रांच्या जगातली नवी चाल. सारख्या बदल्या.) की, तुमच्या घरचे वर्तमानपत्र बदलते.
मात्र, केवळ मित्रकर्तव्य म्हणून तुम्ही या गोष्टी करता असे कोणीही म्हणू शकणार नाही. तुमचा सांस्कृतिक उत्साह या पलीकडला आहे. पुण्याच्या संपन्न सांस्कृतिक जगातले तुम्ही बिनीचे, अथक, हक्काचे आणि नियमीत श्रोते, प्रेक्षक आणि वाचक आहात.
... अपूर्ण
- श्री. विजय तेंडुलकर
('सहवास गुणीजनांचा' या मधू गानूंच्या पुस्तकातील प्रस्तावनेतील काही भाग)
एक जानेवारी : एक संकल्प दिन
पहिला फाटा : पाकीट घ्यायचं नाही. एकेक सुटी सिगरेट घ्यायची.
दुसरा फाटा : अर्धीअर्धी ओढायची.
तिसरा फाटा : दुसऱ्या कोणी दिली तरच ओढायची.
चौथा फाटा : रात्री नऊच्या पुढे ओढायची नाही.
पाचवा फाटा : फक्त जेवणानंतर ओढायची.
सहावा फाटा : चहा व जेवणानंतर.
सातवा फाटा : रात्री नऊऐवजी दहाच्या पुढे ओढायची नाही.
आठवा फाटा : इंपोर्टेड सिगरेटमधला टोबॅको प्युअर असल्यामुळे ते पाकीटच्या पाकीट ओढले
तरी नो हार्म इज कॉजड् इ.इ.
...'सिगरेट सोडणे' या प्रमाणे एक जानेवारीपासून नित्यनेमाने डायरी लिहिणे, पहाटे उठून मैदानात फिरायला जाणे, गच्चीवर फेऱ्या घालणे, अंगणात फेऱ्या घालणे, घरातल्या घरात फेऱ्या घालणे, योगासने करणे, जागच्या जागी धावणे, हे देखील सुप्रासिद्ध संकल्प आहेत. आम्ही दर ५-६ वर्षांनी आलटूनपालटून हे संकल्प नव्या उमेदीने सोडीत आलो आहो...
... ते काही का असेना, एक जानेवारी आली की नवे संकल्प मनात गर्दी करायला लागतात आणि भेटीदाखल येणाऱ्या डायरीची प्रातिक्षा सुरु होते. हा नव्या संकल्पात कालमानाप्रामाणे जुनी पत्रे एकदा नीट पाहून, नको असलेली फाडून टाकून व्यवस्थित लावून ठेवावी, ठिकठिकाणी निर्वासितांसारख्या तळ ठोकून पडलेल्या पुस्तकांच्या आणि मासिकांच्या गठ्ठयावरची धूळ झटकून त्यांची विषयवार विभागणी करुन, वहीत नोंद करावी असे काही संसारोपयोगी संकल्पही असतात. ते पार पडतात की नाही याला महत्त्व नाही. खरी मजा वेळोवेळी आपल्याला कुठले संकल्प सोडावेसे वाटले ते पाहण्यात आहे. ते नाही पाळता आले म्हणून हताश होऊ नये...
... संकल्पाचा आनंद हा प्रत्यक्षाहून अधिक असतो. फार तर सकाळी उठणे, डायरी लिहिणे, सिगरेट न ओढणे, एकदाच जेवणे अशा सद्गुणांची ही मानसपूजा आहे असे मानावे. कल्पनेतल्या धूपदीपांनी जिथे देव खूष होतो तिथे कल्पनेतल्या सज्जनपणाने माणसाने तृप्त राहायला काय हरकत आहे?
तेव्हा आजचा दिवस हा असा कृतीची जबाबदारी न घेता सद्गुणवर्धक संकल्प सोडण्याचा. तो सोडणार असल्याने चारचौघात सांगण्याचा आणि फार तर दोन ते सहा-सात जानेवारींपर्यंत टिकवण्याचा. कुणाचा गणपती दीड दिवसाचा,तर कुणाचा दहा दिवसांचा असतो. तीच गोष्ट संकल्पाची. पुष्कळदा वाटतं की नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी नवे संकल्प सोडायची जगातल्या इतक्या लोकांना जर हौस आहे तर एक जानेवारी हा संकल्प-दिन म्हणून साऱ्या जगाने का साजरा करु नये? आपल्या देशात वर्षाचे दिवस तीनशे पासष्ट असले तरी 'दिन' पाच-सहाशे असतील. 'दिनांच्या दिवशी जरी जाहीर संकल्प सोडला तरी तो दुसऱ्या दिवशीसुद्धा पाळायची गरज नसते' हा धडा आपल्या मान्यवर नेत्यांनीच नाही का आपल्याला घालून दिला? शिवाय एक जानेवारी हा दिन संकल्प-दिन म्हणून साजरा करण्यावाचून आपल्याला गती नाही. 'यंदाच्या वर्षी कुठलाही संकल्प सोडणार नाही,'असे म्हणणेहे देखील संकल्प न सोडण्याचा संकल्प सोडण्यासारखेच आहे.
तेव्हा आजच्या या शुभदिनी आपण सारेजण 'सत्य संकल्पाचा दाता भगवान' असे म्हणू या आणि कुठला तरी संकल्प सोडून नव्या वर्षाचे-एव्हाना दाढदुखी बंद होऊन डोकेदुखी सुरु झाली नसेल तर- हसतमुखाने स्वागत करु या...
पुढे वाचा ........
प्रिय मधु गानू
मी-एक नापास आजोबा
उत्तम बुध्धिमत्तेचा सगळयात चांगला प्रत्यय चांगल्या बालबुध्धितून कसा येतो हे दुसऱ्या बालपणाची पहिल्या बालपणाशी दोस्ति जमल्या शिवाय कळत नाही. माझ्या बुध्धिमत्तेविषयी बाळगोपाळांना शंका असण्याचा माझा अनुभव जुना आहे. कठिण प्रश्न भाईकाकांना न विचारता माईआत्तेला विचारायला हवेत हा निर्णय वीस-एक वर्षांपूर्वी दिनेश, शुभा वगैरे त्या काळात के. जी. वयात असलेल्या माझ्या बालमित्रांनी घेतला होता. माझ्या व्यक्तिमत्वातच, फक्त बाळगोपाळांना दिसणारा अज्ञानप्रादर्शक गुण असावा, नाही तर इतक्या अडिच वर्षांच्या चिन्मयालाही आमच्या घरातलं सर्वात वरिष्ठ अपील कोर्ट शोधायला माझ्या लिहिण्याच्या खोलीत न येता स्वयंपाक घराच्या दिशेनी जाणं आवश्यक आहे हे कसं उमगतं?
सध्या, म्हणजे काय? या प्रश्नाच्या माऱ्याला तोंड द्यावं लागत आहे. बरं, नुसत्या उत्तरानी भागत नाही, मला दाखव असा हुकूम सुटतो. 'आकाश म्हंजे काय?' पासून ते 'आंगन म्हंजे काय?' इथपर्यंत हा प्रश्न जमीन अस्मान आणि त्यातल्या अनेक सजीव-निर्जिव वस्तूंना लटकून येत असतो.
'आंगन म्हणजे काय?' या प्रश्नाने तर माझी विकेटच उडवली होती. सहकारी गृहनिर्माण संस्कृतीत 'आंगण' केंव्हाच गायब झालेलं आहे. घरापुढली म्युनिसिपालटीनी सक्तीने रस्त्यापासून बारापंधरा फूट सोडायला लावलेली जमिनीची रिकामी पट्टी म्हणजे आंगण नव्हे. तिथे पारिजात असावा लागतो. जमीन शेणाने सारवलेली असावी लागते, कुंपणाच्या एका कोपऱ्यांत डेरेदार आंब्याचा वृक्ष असावा लागतो, तुळशीवृंदावनही असावे लागते. रात्रीची जेवणे झाल्यावर एखाद्या आरामखुर्चीवर आजोबा आणि सारवलेल्या जमिनीवर किंवा फारतर दोन चटया टाकून त्यावर इतर कुटुंबीय मंडळींनी बसायचं असतं अशा अनेक घटकांची पूर्तता होते तेंव्हा त्या मोकळया जमिनीचं आंगण होतं. कुंपणावरच्या जाईजुईच्या सायंकालीन सुगंधांनी आमोद सुनास जाहल्याचा अमृतानुभव देणारं असं ते स्थान चिनूच्या 'आंगन म्हणजे काय?' या प्रश्नाचं उत्तर देतांना तो अडीच वर्षांचा आहे हे विसरुन मी माझ्या बाळपणात शिरलो. माझ्या डोळयांपुढे आमच्या जोगेश्वरीतल्या घरापुढलं आंगण उभं राहिलं. त्याला त्यातलं किती कळत होतं मला ठऊक नाही. पण विलक्षण कुतूहलाने भरलेले दोन कमालीचे उत्सुक डोळे या आजोबाला काय झालं या भावनेने माझ्याकडे पाहाताहेत आणि माझी आंगणाची गोष्ट ऐकताहेत एवढंच मला आठवतं चिनूचं ते ऐकणं पाहण्याच्या लोभाने मी मनाला येतील त्या गोष्टी त्याला सांगत असतो. मात्र त्यात असंख्य भानगडी असतात. एखाद्या हत्तीच्या चित्रावरुन हत्तीची गोष्ट सांगून झाली की 'ही आता वाघोबाची गोट्ट कल' अशी फर्माईश होते. एकेकाळी पौराणिक पटकथेत झकास लावणीची 'स्युचेशन' टाकण्याची सुचना ऐकण्याचा पूर्वानुभव असल्यामुळे मी त्या हत्तीच्या कथेत वाघाची एन्ट्री घडवून आणतो. हत्तीच्या गोष्टीत वाघ चपलख बसल्याच्या आनंदात असतांना धाकटया बंधूंचा शिट्टी फुंकल्या सारखा आवाज येतो,
'दाखव'.
'काय दाखव?' मी.
'व्हाग!' चि. अश्विन.
हत्तीच्या चित्रात मी केवळ या बाबालोकाग्रहास्तव वाघाला घुसवलेला असतो. प्रत्यक्ष चित्रात तो नसतो. पण हत्तीला पाहून डोंगरामागे वाघ कसा पळाला याची गोष्ट रचावी लागते. सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या निर्मितिक्षम प्रतिभेची सकाळ-संध्याकाळ अशी तोंडी परीक्षा चालू असते. पहिली गोष्ट चालू असतांना 'दुशली शांग' अशी फर्माईश झाली की पहिल्या गोष्टीत आपण नापास झालो हे शहाण्या आजोबांनी ओळखावे, आणि निमूटपणाने दुसऱ्या गोष्टीकडे वळावे. या सगळया गोष्टींना कसलंही कुंपण नसल्यामुळे इकडल्या गोष्टीतला राजा तिकडल्या गोष्टीतल्या भोपळयांतून टुणूक टुणूक जाणाऱ्या म्हातारीला जाम लावून पाव देतो. वाघाचा 'हॅपी बड्डे' होतो आणि 'इंजिनदादा इंजिनदादा काय करतो?' या गाण्यातल्या इंजिनाला रुळावरुन उचलून आकाशात नेणारी स्चकृत कडवीही तयार होतात.
आज या वयातही सहजपणाने जुळलेलं एखाद्या कवितेतलं यमक पाहून एखाद्या शाळकरी मुलासारखा मला अचंबा वाटतो. शब्दांच्या नादानी कविता नाचायला लागली की आनंद कसा दुथडी भरुन वाहतो याचं दर्शन शब्दांच्या खुळखुळ्यांशी खेळणाऱ्या पोरांच्या चेहऱ्यावर होते. पण नातवंडाबरोबर आजोबांनाही तो खेळ साधला तर हरवलेलं बालपण पुन्हा गवसतं. हल्ली हा खेळ मला रोज खेळावा लागतो. एकदा या चिनू आशूला घेऊन 'चक्कड माडायला' निघालो होतो. 'बाबा ब्लॅकशिप' पासून 'शपनात दिशला लानीचा बाग' पर्यंत गाण्याचा हलकल्लोळ चालला होता. शेवटी हा तार सप्तकातला कार्यक्रम आवरायला मी म्हणालो, 'आता गाणी पुरे गोष्टी सांगा' गोष्टीत किंचाळायला कमी वाव असतो.
'कुनाची गोट्ट?'
'राजाची गोष्ट सांग... आशू, चिनू दादा गोष्ट सांगतोय गप्प बसून ऐकायची. हं, सांग चिनोबा...'
'काय?'
'गोष्ट!'
'कशली?' 'राजाची'. मग चिनूनी गोष्ट सांगायला सुरुवात केली.
'एक होता लाजा.' त्यानंतर डोळे तिरके करुन गहन विचारात पडल्याचा अभिनय, आणि मग दुसरं वाक्य आलं, 'तो शकाली फुलाकले गेला.'
'कोणाकडे?' शिकारीबिकारीला जाणाऱ्या राजांच्या गोष्टी मी त्याला सांगितल्या होत्या. पण फुलाकडे जाणारा राजा बहुदा शांतिनिकेतनातला जुना छात्र असावा.
'फु... ला... क... ले... ' चिनू मला हे आवाज चढवून समजावून सांगतांना माझ्या प्राचीन शाळा मास्तरांच्या आवाजातली 'ब्रह्मदेवानी अक्कल वाटतांना चाळण घेऊन गेला होतास काय पुर्ष्या ऽ ऽ ' ही ऋचा पार्श्वसंगीतासारखी ऐकू आली.
'बरं, फुलाकडे... मग?'
'मग फुलाला म्हनाला- फुला रे फुला, तुला वाश कोनी दिला?'
क्षणभर माझ्या डोळयांवर आणि कानांवर माझा विश्वास बसेना. हे एवढंसं गोरंपान ध्यान उकाराचे उच्चार करतांना लालचुटुक ओठांचे मजेदार चंबू करीत म्हणत होतं 'लाजा फुलाकले गेला आनि म्हनाला- फुला रे फुला, तुला वाश कोनी दिला?' एका निरागस मनाच्या वेलीवर कवितेची पहिली कळी उमलतांना मी पाहतोय असं मला वाटलं.
'मग फुल काय म्हणालं?' एवढे चार शब्द माझ्या दाटलेल्या गळ्यातून बाहेर पडतांना माझी मुष्किल अवस्था झाली होती.
'कोनाला?' 'अरे राजाला. राजानी फुलाला विचारलं ना, फुला रे फुला तुला वास कोणी दिला? मग फुल काय म्हणालं?'
'तू शांग...'
मी काय सांगणार कपाळ! फुला रे फुला तुला वास कोणी दिला या प्रश्नाचं उत्तर दयायला लागणारी बालकवी, आरती प्रभू किंवा पोरांच्या मनात नांदणारी गाणी लिहिणाऱ्या विंदा करंदीकर, पाडगावकरांना लाभलेल्या प्रतिभेची वाटणी चालू असतांना देवा पुढे चाळण नेण्याची दुर्बुद्धी मला नक्की झालेली असावी. 'फुला रे फुला तुला वास कोणी दिला?' या प्रश्नाचं उत्तर अजूनही मला सापडलेलं नाही. सुदैवाने परीक्षक हा प्रश्न विचारल्याचं विसरुन गेले असले तरी त्या परीक्षेत मी नापास झाल्याची भावना मला विसरता येत नाही. नुसती गोळया-जर्दाळूंची लाच देऊन आजोबा होता येत नाही. त्याला फुलाला वास कोणी दिला या प्रश्नाचं उत्तरही ठाऊक असावं लागतं आणि तेही यमकाशी नातं जुळवून आलेलं।
पुढे वाचा .........
एक जानेवारी : एक संकल्प दिन
एका गाढवाची गोष्ट
आणि एके दिवशी कधीही कारणाशिवाय न ओरडणारे ते दोन गाढव निष्कारण ओरडू लागले. एकमेकांना भयंकर लाथाळी करु लागले. चहूबाजूचे लोक धावून आले. 'अशी लाथाळी आम्ही जन्मात पाहिली नव्हती' असे जो तो म्हणू लागला. गाढवीण बुचकळयात पडली. जन्मभर सालसपणाने सेवा करणारे हे गाढव असे का वागताहेत? तिला काही सुचेना. येथे या गाढवांची लाथाळी चाललीच होती. त्या विवंचनेत एके दिवशी संध्याकाळी ती खिन्न मनाने गावातल्या भगिनी-समाजापुढला उकिरडा फुंकीत असताना तिला शेजारच्या कुंभाराची गाढवीण भेटली.
'का, गाढवीणबाई? अशा खिन्न का?'
'काय सांगू बाई तुला? आमच्या जोडीदार गाढवांची हकीकत कळली नाही का तुला?'
'त्या भयंकर लाथाळीची ना?' शेपूट वेळावीत गाढवीण म्हणाली.
'हो!' कुठल्याशा अध्यक्षीणबाईच्या गळयात पडलेला सुकलेला हार खुराने उडवीत पहिली गाढवीण म्हणाली. 'खरं सांगू का तुला?' 'काय?' 'हा लाथाळीचं कारण मला ठाऊक आहे. पण म्हटलं, उगीच दुसऱ्यांच्या भानगडीत आपण का पडा?' 'काय ते?' कानांना नाजुक हिसडा देत गाढवीण म्हणाली. तिच्या काळयाशार नाकपुडया थरथरत होत्या. 'विचारलंस तर सांगते बापडी! परवा काय झालं, मी आणि नाम्या कुंभाराची गाढवीण चरायला निघालो होतो. मी आपली नेहमी इथे भगिनी-समाजापुढे चरायला येते. इथे पुष्कळ अहवाल, भाषणं, प्रसिद्ध महिलांचे संदेश, वगैरे खायला मिळतात. आणि मागच्या खेपेपासून मला ही वर्तमानपत्रं पचेनाशी झाली आहेत. पण नाम्या कुंभाराच्या गाढवीणीनं आग्रह केला म्हणून वाचनालयापुढचा उकिरडा फुंकायला गेले मी! तिथे तुझे ते दोन गाढव आले होते. आणि कुणाला सांगू नकोस, पण दोघांनीही दोन निरनिराळ्या संपादकांची साप्ताहिकं खाल्ली. तेव्हापासून तिथेच त्यांची लाथाळी सुरु झाली... मागे एकदा त्या एका गाढवाने कसला मजूर पुढाऱ्याच्या भाषणाचा कागद खाल्ला होता, तेव्हा तो त्याच्या कुंभारालाच लाथा मारायला लागला होता.
'पण याला उपाय काय बाई?'
'अगं, सोपा आहे. गावात तो सिनेमा आहे ना तिथे नटींची चित्रं छापलेल्या जाहिराती वाटतात. पाच-पाच जाहिराती सकाळ- संध्याकाळ खायला घाल त्यांना. लगेच गप्प होतात की नाही पाहा.' असे म्हणून दुसरी गाढवीण 'महिला आणि क्रांती'तले उरलेले भाषण खाऊ लागली. पहिली गाढवीण सिनेमाच्या रस्त्याने धावू लागली.
'तिच्या धावण्यात एक मुक्त आनंदाचा अटूत आविष्कार होता' असे वाङमयमंदिरापुढे उभा असलेला एक गाढव नंतर कोणालासे सांगत होता।
पुढे वाचा ..................
मी-एक नापास आजोबा
Jun 17, 2009
साहित्यिक पु . ल

१)त्यांच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले। योगायोगाने माहेरचेआणि सासरचे आडनाव एकच होते। हे कळल्यावर पु.लं. म्हणाले"बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो".
६)एका समारंभात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पुलंची गाठ पडली.बाबासाहेब बोलण्याच्या ओघात बोलुन गेले. "तुमच्या घरी काय, तुम्ही आणी सुनीताबाई सारखे खो खो हसत असणार".ह्यावर गंभीरपणे पु.ल. ही त्यांना म्हणाले."तुमच्या घरी सुद्धा बायको तुमच्यावर तलवरीचे सारखे वार करतेय आणि तुम्ही ते ढाल हाती घेउन चुकवताहात, असंच सारखं चित्र असतं का हो?"
७)पुलंच्या हजरजबाबीच्या अनंत कथा बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे सांगितल्या जातात.'आनदंवनातल्या ग्रामभोजनाच्या थाटात चाललेल्या एका भोजन समारंभात विविध क्षेत्रातली मातब्बर मंडळी सहभागी झाली होती.समोरच्या पंगतीत 'किर्लोस्कर' मासिकाचे संपादक मुकंदराव किर्लोस्कर बसलेले होते.मधुनच ते उठले व तो सुखसोहळा आपल्या केमे-यात बंद करण्याच्या कामात लागले. परत येऊन पाहतात, तर ह्यांच पान गेलेलंह्यांची शोधक नजर पु.ल. लगेच उद,गारले, "मुकुंदराव, इथं संपादकीय पान नाहीये."
८)मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या एका वर्धापनदिन सोहळ्यात पु.लं. यांनी सरकारी कामकाजातील दुबोध मराठी भाषेचा खरपूस समाचार घेतला.ते म्हणाले,"रेडिओवरच्या मराठीतीन 'अमूक वृत्त पोलीस सुत्रांनी दिल' असं मी जेव्हा ऎकलं, तेव्हा पोलीससुत्र हे काय प्रकरण आहे, ते मल्ल कळेना! आता कळलं. 'सुत्र' हे इंग्रजी सोर्स चं भाषांतर आहे. पोलीस कचेरीतुन ही माहीती मिळाली, असं सांगितलं असतं, तर वृत्तनिवेदकला काय पोलिसांनी पकडलं असतं? म्हणजे आता आपल्या बायकोकडुन एखादी बातमी कळली, तरी ती 'मंगळसुत्रा'कडुन कळली, असं म्हणायला हरकत नाही!"
९)माणिक वर्मा या प्रसिद्ध गायिका.एका संगीत कार्यक्रमात सुधीर गाडगीळ त्यांची मुलाखात घेत होते. प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसून पु.लं. ही मुलाखात ऎकत होते.हसत खेळत चाललेल्या त्या मुलाखतीत गाडगीळांनी माणिक वर्मा यांना, त्यांच्या पतीबद्दल प्रश्न विचारला, "तुमची अन, त्यांची पहिली भेट नेमकी कुठं झाली होती?"लग्नाला खुप वर्षे होऊनही माणिक वर्मा या प्रश्नाला उत्तर देताना टाळाटाळ करीत होत्या.ते पाहुन पहिल्या रांगेतील पु.लं. उत्स्फुर्त्पणे मोठ्यानं म्हणाले, "अरे सुधीर, सारखं सारखं त्यांच्या 'वर्मा'वर नको रे बोट ठेवुस!"
१०)कोल्हापूर आणी तेथील एकूणच भाषा व्यवहार म्हणजे पु. ल. च्या मर्मबंधातील ठेव. कोल्हापूरी समाजाइतकाच कोल्हापूरी भाषेचा बाज सागंताना ते म्हणाले, 'इथे रंकाळ्याला रक्काळा म्हणतात पण नगर्याच्या नंगारा करतात. कोल्हापूरातलं इंग्रजी शेक्सपीयरला देखील कबरी बाहेर येऊन आपल्या छातीवर हात बडवायला लावील असं आहे. त्यानं शेतात ऊसं लावला' याच इग्रंजी रूपांतर इथल्या मुन्सफानं एकदा ' He applied U'S In his farm असं केलं होतं आणि त्यावेळच्या शुध्दलेखनच्या नियमाप्रमाणं 'यू' वरती अनुस्वार द्यायलाही तो विसरला नव्हता.
११)एकाने आपल्या बायकोच्या पहिल्या डोहाळजेवणाला तिला पाताळाऎवजी पु.ल. चे 'हसवणूक' हे पुस्तक दिले. पुस्तकावर त्याने लिहीले, 'प्रिय ___हिस, तुझ्या पहिल्या दोहदभोजनाप्रसगीं पाताळाऎवजी पुस्तक देण्यामागील विशुध्द हेतु फसवणूक नसून हसवणूक हाच आहे. तुझाच___!' त्यावर ही त्याची पत्नी चिडली. तिने थेटं पु.ल. कडेच धाव घेतली. पु.ल. नी त्याच अर्पण पत्रीकेखाली स्वाकक्ष्ररीनिशी त्याला समजावले, 'आपल्याकडे नवर्यानं पत्नीवरील आपलं दाट प्रेम पातळानंच व्यक्त करायचं असतं, हे विसरायचं नसतं मिस्टर!"
१२)नवीन शुध्दलेखनाचे नियम जर उच्चारानुसारी केले तर त्यानुसार होणारे शुध्दलेखन अधिक सुलभ व बिनचूक होईल, असं महामंडाळात घाटत होतं. त्यावर पु.ल. नी खालील छेद दिला, 'मी नुकताच एका ग्रामीण शाळेत गेलो होतो. तिथं मास्तर मुलांना शुध्दलेखन घालीत होते. ते म्हणाले, 'पोरांनो लिवा. कयाssssळs!'
१३)हिंदुह्र्द्ययसम्राट बाळासाहेब ठाकरे यानां काही कारणास्तव हिंदुजा होस्पिटल मध्दे दाखल करण्यारत आले होते. ते ऎकताच पु.ल. उध्दारले, 'त्यांच्या खोलीच्या दरवाज्यावर आता 'गर्वसे कहो हम हिदंजा मे हे' असं लिहालया हरकत नाही.'
१४)साहीत्य सघांत कुठल्याशा रटाळ नाटकाचा पहिलाच प्रयोग चालू होता. पु.ल. ना आर्वजुन बोलावले होते. नाटकाचा पहिला अकं चालू असता- नांच पडल्याचा आवाज झाला. शेजारचा घाबरुन पु.ल. ना म्हणाला, ' काय पडलं हो?' 'नाटक दुसरं काय?' पु.ल. उत्तरले.
१५)कोल्हापुरला एकदा आमच्या नाटकाचा प्रयोग असतांना नाटकात काम करणारी एक मेत्रीण नुकतीच बाजारात जाऊन आली होती व अगदी रंगात येऊन मला सागंत होती, काय सुदंर सुदंर कोल्हापुरी साज आहेत गं इथल्या बाजारात., अप्रतीम नमुने आणि सूदंर कलाकुसर, अनं भरगच्च तर इतके की एक साज घातला गळ्यात की दुसंर काहीच घालायला नको.' हे ऎकत जवळपास असलेले भाई मीश्कीलपणे हळुच म्हणाले, 'खरं सागंतेस की काय?' क्षणभराने त्यातली खोच लक्षात आल्यावर ऎत्रिणीचीं लाजुन व आमची हसुन मुरकुंडी वळली.
१६)'वॆद्यकातली एकच गोष्ट या क्रीकेटमध्ये येऊन चपखल बसली आहे. ती म्हणजे त्रिफळा. खेळणारांचे येथे चुर्ण व्हावे. गोट साफ.' - इती पु.ल.
१७)एकदा वसतंराव देशपांडे पु.लं. ना म्हणाले "हि मुलगी (सुनिताबाई) म्हणजे एक रत्न आहे'. ह्यावर पु.लं. लगेच म्हणाले 'म्हणुनच गळ्यात बांधुन घेतलय!!
१८)एकदा आपली आणी सुनिताबाईंची ओळख करुन देताना पु.लं. म्हणाले की "मी 'देशपांडे' आणी ह्या 'उपदेशपांडे"
१९)एकदा एक भोजन समारंभात पु.लं. च्या एक बाजुला श्रि ना.ग. गोरे आणि दुस-या बाजुला श्रि भुजंगराव कुलकर्णी बसले होते. पु.लं. म्हणाले, "आफतच आहे. एकिकडे नाग आहे तर दुसरीकडे भुजंग! !!"
२०)एकदा पु.लं. ना एक कुकरी सेट गिफ्ट म्हणुन मीळाला. तो सेट सुनिता देशपांडे आपल्या भाचीला दाखवत होत्या.सुनिताबाईंचा 'सर्व काही जपुन ठेवण्याचा " स्वभाव माहित असल्यामुळे भाची सुनिताबाईंना म्हणाली" अगं, एवढा सुदंर सेट फुटु नये या भितीने तु तो कधी वापरणारच नाहीस का?"त्यावर पु.लं. पटकन म्हणाले "हो तर !! सुनीता मला कधी ओमलेट सुद्धा करुन देत नाही ... अंडी फुटतील म्हणुन !!!"
२१)पु.लं. चा वाढदिवस होता,एका मार्केट यार्डाच्या व्यापारी चाहत्याने त्यांच्या गळ्यात सफरचंदाचा हार घातला.पु.लं. त्या वजनाने थोडे झुकले.हे बघुन व्यापारी म्हणाला "काय राव, काय झाले येवढे"?पु.लं. म्हणाले, "बरे झाले तुम्ही नारळाचे व्यापारी नाही"घरात हशा पिकला होता !
२२)एकदा पु.लं. प्रवासात असताना त्यानां कोणीतरी भेटला,तो त्याचां चाहता होता. तो म्हणाला कीमाझी फक्त दोन व्यक्ती वर श्रद्धा आहे, एक ञानेश्वर आणी दुसरे तुम्ही.माझ्या खोलीत मी ञानेश्वरा च्या फोटो समोर तुमचा ही फोटो ठेवलाय.तर पु.लं. म्हणाले "अहो असं काही करु नका नहीतर लोक विचारतील, ञानेश्वरानी ज्याच्या कडुन वेद म्हणुन घेतले तो रेडा हाच का म्हणुन?"
२३)पुलं एकदा चितळ्यांच्या दुकानात गेले, मिठाई खरेदी केली आणि खोक्यात बांधून द्यायला सांगीतले. दुकानातील व्यक्ती म्हणाली "खोक्याचा चार्ज पडेल". त्यावर पुलं म्हणाले (म्हणे), "अरे वा, म्हणजे मिठाई फुकट?"
२४)एकदा पु.ल. एक खेड्यात उतरले होते. तिकडच्या शाळेच्या प्रिन्सिपलनी त्यांना शाळेत बोलावून त्यांचा सत्कार केला. पुलंनी दिलेल्या खुर्चीवर बसतच त्या खुर्चीचा हात मोडला. सगळी पोरं खो खो हसायला लागली.ओशाळलेले प्रिन्सिपल पुलना म्हणाले, "माफ करा पण हजारवेळा सांगूनही इकडच्या सुतारांकडून नीट कामच होत नाही."पुल मिश्किलीत म्हणाले, "अहो करवत (!) नसेल"२५)डो. श्रीरंग आडारकर यांचे चिंरजीव अशोक यांना त्याच्या विवाहनिमित्त पु.लनी पाठविलेले पत्र."आजचा दिवस तुझ्या कोमल आयुष्याचा महत्त्वाचा.सुमारे चौतीस वर्षापूर्वी, जून महिन्यातच असाच एक महत्त्वाचा दिवस माझ्या आणि तुझ्या सुनीतामावशीच्या आयुष्यात आला होता."२६)स्वत:च्या खास विनोदी पध्द्तीत पु.ल.एके ठिकाणी म्हणतात," मुलगी अगर मुलगा सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे ! कारण वळण म्हटल्यावर ते सरळ कसे असणार ? भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आड्वळणी व्याख्या आहे"
२७)आपल्या पत्नीच्या सतत उपदेश करण्याच्या तथाकथित सवयीमुळे पु.ल. एकदा आपल्या पत्नीला-सुनीताईंना -म्हणाले," या घरात मी तेवढा देशपांडे आहे.तू ’उपदेश-पांडे’ आहेस."
२८)भारती मंगेशकर ह्या दामु अण्णा मालवणकर ह्या प्रसीध्द्य विनोदी कलाकाराची कन्या.त्या दिसायला अतिशय सुरेख होत्या आणी दामू अण्णा तसे दिसायला खास नव्हते!त्यामुळे पु.लं. नी जेव्हा तीला पाहिले तेव्हा म्हणाले " हि मुलगी बापाचा डोळा चुकवुन जन्माला आली आहे !!!"
२९)पु.लं.च्या एका सभेला अत्रे अध्यक्ष होते. आपल्या भाषणात ते म्हणाले, पु.ल. थोर साहित्यीक आहेत, त्यांनी खुप साहित्य नीर्मीती केली आहे. नंतर त्यांच्या कडें बघत ते पुढे म्हणाले सहाजिक आहे, त्यांच्या नांवात पु आणि ल दोन्ही आहे,मग निर्मीतिस काय कमी?
३०)पुलं एका समारंभाला जाण्यासाठी तयार होत असताना म्हणाले," मी कुठल्याही समारंभाला 'बो'लावल्याशिवाय जात नाही.
३१)एकदा पु लं चे पाय खूप सुजले होते. तेव्हा आपल्या सुजलेल्या पायांकडे बघत ते म्हणाले," आता मला कळले,पायांना पाव का म्हणतात ते!"
३२)पुण्यात भानुविलास नावाचे चित्रपटगृह होते. तर सुरुवातीला त्याला पत्र्याचे छप्पर होते. आणि त्याच्या छतातूनउन्हाचे कवडसे पडत असत. एकदा पु.ल.(?) तिथे गेले होते आणि ते कवडसे पाहून म्हणाले "अगदीबरोबर नाव ठेवले आहे, भानुविलास!"
३३)'वाऱ्यावरची वरात'चा रवींद नाट्य मंदिरातला रात्रीचा प्रयोग. दुसऱ्या दिवशी बोहल्यावर चढायचे होते. लालजी देसाई आपले काम आटपून घाईघाईने निघाले. विंगेत उभे असलेल्या पुलंनी अंधारातच हात धरला आणि म्हणाले... 'प्रयोग संपेपर्यंत थांब!' लालजींना कळेना. प्रयोग संपला. पण पुलंनी पडदा पुन्हा उघडायला लावला. लालजींचा हात धरून ते त्यांना रंगमंचावर घेऊन आले आणि प्रेक्षकांना म्हणाले, 'उद्या याची 'वरात' निघणार आहे, पण तो आजच 'वाऱ्यावर' स्वार होऊन आला आहे'...आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
३४)पुणे आकाशवाणीवर १९५५ मध्ये पु.ल. विशेष कार्यक्रमांसाठी प्रमुख म्हणून कार्यरत होते. जागेची अडचण असल्यामुळे एकाच मोठ्या खोलीत सगळे निर्माते एकत्र बसत असे. त्यांत पु.ल., कविवर्य बोरकर, व्यंकटेश माडगूळकर, मिरासदार अशी मंडळी असायची. त्यावेळचा एक प्रसंग .महात्मा गाधींची जयंती जवळ आली होती. तेव्हा २ ऑक्टोबरचे कार्यक्रम ठरवण्यासाठी केंद्र्संचालकानी निर्मात्यांच्या बैठकीत सूचना विचारल्या. कुणी काही कुणी काही कार्यक्रम सुचवले पु.ल. म्हणाले "गांधाजींना मौन प्रिय होते. तेव्हा आपण २ ऑक्टोबरला मौन पाळावे व एकही कार्यक्रम ठेवू नये." यावर संचालकांसह सर्व जण खळखळून हसले.
३५)एकदा एक 'कदम' नावाचे गृहस्थ पु लं कडे मुलगा झाल्याचे पेढे घेऊन आले.....पु लं नि आशीर्वाद दिला .......'कदम कदम बढाये जा'
३६)सुनीताबाईंसह वसंतराव देशपांडे आणि पुलंचा गाडीतून प्रवास सुरू असताना जेव्हा समोर एक मोठा गवा आक्रमक भूमिकेत येतो आणि वसंतराव सुनीताबाईंना इंग्रजीत काही तरी सूचना करतात, हे ऐकून "पुलं' म्हणतात, "त्या गव्याला इंग्रजी समजत नाही म्हणून वसंतराव इंग्रजीत बोलतात'३७)एका सगींत संमेलनाच्या भाषणात पु.ल. नी एक किस्सा सांगितला होता.’एकदा एका शेताच्या बांधावरुन जात असताना एक शेतकरी शेतात काहीतरी काम करताना दिसला. आम्हा लेखकांना कुठे गप्पा केल्याशीवाय राहवत नाही. त्या स्वभावानुसार मी त्या शेतकराला विचारलं "काय हो शेतकरी बुवा, या झाडाला कोणते खत घातले तर त्याला चांगले टॉमेटो येतील?" त्यावर तो शेतकरी चटकन म्हणाला "या झाडाला माझ्या हाडांचे खत जरी घातलेत तरी त्याला टॉमेटो कधीच येणार नाहीत कारण ते झाड वांग्याचे आहे।"३८)काळ बदलला, तशी माणसंही बदलली. स्पर्धेच्या जगात पाश्चात्त्य संस्कृतीचे वारे वाहू लागले. माणसं इंग्रजाळलेली झाली. अमेरिकन संस्कृती झपाट्यानं रुजू लागली. गणेशोत्सवाचा मूळ उद्देश दूर झाला आणि उत्सवाचं एकंदर स्वरुपच पालटलं.गणपतीच्या मिरवणुकीत चालणारे रोंबा, सोंबा, डिस्को नाच पाहून आणि प्रदुषणात भर घालणारी गाणी ऐकून ' पुलं ' गंभीर झाले. यावरची आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते एकदा गंमतीनं म्हणाले,' आजकाल मला आपला गणपतीबाप्पा ' गणपतीपप्पा ' झाल्यासारखा वाटत
३९ )आणीबाणीनंतरच्या निवडणुकांच्या प्रचारधुमाळीत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमाची भगवद्गीतेशी तुलना केली होती. परंतु गीतेचे अध्याय अठरा असताना अशी तुलना मुख्यमंत्र्यांनी का केली असावी, असा प्रश्न पडल्याचं सांगून पु.ल. म्हणाले,' मी पुन्हा गीता उघडली. सुरुवातीलाच ' संजय उवाच ' असे शब्द आढळले आणि मग मला सगळा उलगडा झाला !'पुलंनी जनता पक्षाच्या प्रचारसभेतून भाषण सुरू करताच ' त्यांना आत कंठ फुटला आहे ' असे उद्गार यशवंतराव चव्हाणांनी काढले होते.त्याचा समाचार घेताना पु.ल. म्हणाले, ' गळा यांनीच दाबला आणि बोलू दिलं नाही, आणि आता म्हणतात, कंठ फुटला. ते असो, पण निदान मी गळ्यात पट्टा तरी घातलेला नाही !
४०)एक गाजलेल्या संगीत नाटकात एक सुप्रसिद्ध गायक नट कित्येक वर्षं श्रीकृष्णाची भूमिका करत होता. खरं तर, उतारवयामुळं ती भूमिका त्याला शोभत नव्हती, तरीही त्याचं आपलं श्रीकृष्णाची भूमिका करणं सुरूच होतं.प्रश्न होता, त्याला हे सांगायचं कुणी ?एका रात्री त्या नाटकाचा प्रयोग होता. प्रयोगापूर्वीची नेहमीची गडबड सुरू होती. तो नट पीतांबर नेसून, रत्नजडित अलंकार लेवून आणि डोक्यावर मुकूट चढवून, श्रीकृष्णाच्या संपूर्ण पेहरावात हातावरचा शेला आणि सुटलेलं पोट सावरत रंगपटात उभा होता.तेवढ्यात पु.लं. आपल्या काही मित्रांबरोबर रंगपटांत आले. क्षणभर त्या सजलेल्या श्रीकृष्णाकडे पाहतच राहिले. कदाचित त्या नटाचं त्याच्या तारुण्यातील देखणं रुप त्यांच्या डोळ्यासमोर क्षणभर तरळलं असावं. पु.लं.च्या मित्रांना त्यांचं हे त्याला न ओळखण्यासारखं पाहणं थोडं नवलाईचं वाटलं. न राहवून त्यांनी विचारलं, ' हे काय, भाई, ह्यांना ओळखलं नाही का ? अहो, हे आपले... 'पुलं त्यांना मध्येच थांबवत म्हणाले, ' अरे व्वा ! ओळखलं नाही, कसं म्हणता ? ह्यांना पाहूनच तर आज देवाला ' अवतार ' ध्यान का म्हणतात, ते समजल.
४१)एकदा पुलं गोव्याहून पुण्याला मोटारनं येत होते. त्यांच्यासोबत वसंतराव देशपांडे आणि सुनीताबाई होत्या. वाटेत एक जंगल लागलं. जंगलाच्या आडवळणावर एक महाकाय बायसन (गवा / रानरेडा) त्यांच्या गाडीसमोर आडवा आला.रानरेडा हा महाशक्तिशाली आणि आक्रमक प्राणी ! त्यानं धडक दिली तर ट्रकही आडवा होईल. तिथं फिअॅट गाडी काहीच नाही. एक अर्थानं समोर प्राणसंकटच उभं ठाकलेलं.प्राणभयानं घाबरुन गेलेले वसंतराव देशपांडे पुलंना हळूच म्हणाले, ' भाई ही इज चार्जिंग !'वसंतरावांच्या तोंडचे हे इंग्रजी उद्गार ऐकून तसल्या जीवघेण्या प्रसंगातही पु.ल. म्हणाले, ' त्या गव्याला कळू नये, म्हणून वसंतराव इंग्रजीत बोलताहेत !
४२)एकदा पुलं पुण्यातील एका मिठाईच्या दुकानातून मिठाई आणायला गेले. त्या मिठाईवाल्यानं कागदात बांधून ती मिठाई दिली. कागदातल्या मिठाईकडे पाहत पुलंनी ' बॉक्स मिळेल का ?' म्हणून विचारलं.' हो पण त्या बॉक्सला पैसे पडतील. ' दुकानदारानं टिपिकल पुणेरी पद्धतीनं उत्तर दिलं. ' अरे वा ! म्हणजे मिठाई फुकट , वाटतं ? लगेच पुलं उद्गारले.
४३)गप्पांच्या ओघात पुल एकदा म्हणाले, ' मामा या नावाची गंमतच आहे. त्याला शकुनी म्हणावं, तरी पंचाईत आणि अपशकुनी म्हणावं तरी पंचाईत. '४४)हौसेसाठी प्रवास करणा-या टूरिस्टला मराठीत काय म्हणावं, असा प्रश्न पुलंना कुणी तरी विचारला. त्यावर पटकन पुल म्हणाले, ' त्यात काय ? ' सफरचंद ' म्हणावं. 'मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी विचारलं, ' एअरहोस्टेसला आपण ' हवाई सुंदरी ' म्हणतो, तर नर्सला ' दवाई सुंदरी ' का म्हणू नये ? आणि वाढणा-याला आपण जर ' वाढपी ' म्हणतो, तर वैमानिकाला ' उडपी ' का म्हणू नये ?'त्याच सुरात पुलं खूप दारू पिणा-याला ' पिताश्री ' किंवा ' राष्ट्रपिता ' म्हणतात
४५)अरुण आठल्ये आणि पुलं एकदा चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी म्हणून गेले. चायनीज फूडचं वैशिष्ट्य सांगताना पुलं म्हणाले,' चायनीज फूड स्टार्टस वुईथ चिलीज अॅण्ड एण्डस वुईथ लिचीज.' चायनीज फूड पाहताच त्यांना आजची शिक्षणपद्धती आठवते.जेवण घेताना खूप जेवल्यासारखं वाटतं, पण थोड्याच वेळात भूक लागते, हे लक्षात घेऊन पुलं म्हणतात, ' आपल्या शिक्षणासारखं हे चिनी जेवण घेताना खूप घेतल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात पोट रिकामंच राहतं. 'चिनी स्वीट कॉर्न सूप फार प्रसिद्ध आहे. या जेवणात मका फार वापराला जातो. त्यावर पुलंचं भाष्य : ' चिनी भोजनाला सर्वात्मका म्हणायला हवं !'
४६)पुलंच्या ' सुंदर मी होणार ' या नाटकावर आधारित असलेला ' आज और कल ' हा हिंदी चित्रपट यशस्वी झाला नाही. त्याबद्दल बोलताना पुल म्हणाले, ' हा चित्रपट त्याच्या नावाप्रमाणं दोनच दिवस चालला. ' आज और कल !'
४७)१९६५ साली पु.लं. नांदेडच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. ती बातमी ऐकल्यावर अत्यानंदाच्या भरात श्री. श्रीराम मांडे यांनी ' पुलायन ' ही दिर्घ कविता एकटाकी लिहून काढली. त्यात त्यांनी ' पुलंकित ' शब्द प्रथम वापरला आणि नंतर तो खूपच लोकप्रिय झाला.
४८)' माझे खाद्यजीवन ' या लेखात चिवड्यासंबंधी लिहिताना पुलं म्हणतात , '' चिवडा सोलापूरपेक्षा कोल्हापूरचा ! छत्रे यांचा ! महाराष्ट्रावर या तीन छत्र्यांचे अनंत उपकार आहेत . एक चिवडेवाले , दुसरे सर्कसवाले आणि तिसरे केरूनाना गणिती ! उपकार उतरत्या श्रेणीने घ्यावे ! कारण चिवडेवाल्या छत्र्यांनी कोल्हापूरच्या ' रम ' ला जी झणझणीत साथ दिली , ती असंख्य उघडे शेमले आणि काही चोरट्या झिरमिळ्या अस्मानात पोहोचवून आली ....'' हे वाचल्यानंतर कोल्हापुरी संगीत चिवड्याचे आद्य निर्माते छत्रे गहिवरून गेले . त्यांनी आपले वार्धक्य विसरुन स्वतःच्या हातांनी पुलंसाठी चिवडा केला . पंधरा - सोळा वर्षापूर्वीची गोष्ट आहे . त्यांनी पुलंना सांगितले , कित्येक वर्षांनंतर मी स्वतः खास चिवडा बनवतो आहे . तो स्विकारा .त्यांनी त्यापूर्वी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या चिवड्याचा डबा पाठवला होता . कुणाला ? लोकमान्य टिळकांना ! लोकमान्य विलायतेला निघाले होते तेव्हा !
४९)'' हॅलो , शान्ताबाई ना ? मॉस्कोहून गोर्बाचेव्ह तुमच्याशी बोलू इच्छितायत . तुमच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ... '''' काय भाई , तुम्ही नाव कधी बदललंत ? अं ?''फोनवरील व्यक्तीचा सुपरिचित आवाज बरोबर ओळखून , हसू आवरत शान्ताबाई पु . लं . ना दाद द्यायच्या ...बारा ऑक्टोबर हा ज्येष्ठ कवयित्री शान्ता ज . शेळके यांचा आणि आठ नोव्हेंबर हा मराठी माणसांचे लाडके व्यक्तिमत्त्व पु . ल . देशपांडे यांचा वाढदिवस . उभा महाराष्ट्र दरवर्षी ते आपलेपणाने साजरे करीत ; तर साहित्यक्षेत्रातील ही दोन मोठी माणसं एकमेकांच्या अशा ' खोड्या काढीत ' साजरा करीत . पण पु . लं . आणि सुनीताबाईंच्या विवाहाचा ' बारा जून ' हा ( भाईंचा स्मृतिदिनही हाच ) खास दिवस शान्ताबाईंनी आवर्जून सुनीताबाईंना भेटण्याचा दिवस असायचा ।
50)एकदा पु ल शाळेत असताना त्यांना कोणीतरी म्हणाले," ए देशपांडे तुमचे पूर्वज शेण वीकायचे ना ? "त्यावर पु ल लगेच म्हणाले," हो ना तुमच्या पूर्वजांना शेण खायला लागायचा ना म्हणून वीकायचो आम्ही। "
पुढे वाचा ..........
एका गाढवाची गोष्ट
Jun 14, 2009
कालनिर्णय :मराठी दिनदर्शिका २००९
चिंटू

चिंटू (Chintoo) ही सकाळ वृत्तपत्रात प्रसिद्ध होणारी मजेदार चित्रकथा आहे. चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर हे चिंटूचे लेखक आहेत. चिंटूचा पहिला अंक २१ नोव्हेंबर १९९१ रोजी प्रसिद्ध झाला. तेव्हापासून आजवर चिंटू अनेक अबालवृद्धांचा लाडका बनला आहे
चिंटू, या मालिकेचा नायक, एका मध्यमवर्गीय घरातील मुलाचे प्रतिनिधित्व करतो। या चित्रकथेच्या मालिकेत त्याच्या दिवसातिल घटनांना एक विनोदी वळण दिले आहे. चिंटू त्याच्या वयाच्या सर्व मुलाना असणरया समस्या भेडसावतात जसेकी पालकांकडून अभ्यासाचा दबाव, गुंड मुलांकडून त्रास वैगेरे. त्याला खोड्या काढायला खुप आवडतात. चिंटू छोट्या छोट्या गोष्टींमधुन मजा करत असतो. त्याला क्रिकेट बघणे आणी खेळणं आवडत. शेजारच्या जोशीकाकूंच्या बागेतून आंबे किंवा कैरया तोडणे हा पण एक आवडता उद्योग आहे. त्याला प्राणी पाळणे आवडते पण त्याचे आई पप्पा त्याल नेहमी विरोध करतात.
चिंटू मधील पात्रे:
पप्पा
चिंटूचे बाबा (वडिल).
आई
चिंटूची आई.(दिपा)
पप्पू
चिंटूचा सर्वात जवळचा मित्र. हा चिंटूला संकटात नेहमी मदत करतो. पण राजू हे एक खुप मोठे संकट आहे जे कुणालाच आवरता येत नाही.
मिनी
चिंटूच्या कंपुतली मुलगी. हिला शाळेत जाण, परिक्षा आणी अभ्यास आवडतो. ती मनापासुन कविता करते परंतु तिच्या कंपुमध्ये कुणालाच तिच्या कविता आवडत नाहित. मिनीला आवडणार सर्व गोष्टी चिंटूला नकोश्या वाटतात. चिंटू आणी मिनीच बहुतेक वेळेस पटत नाही.
बगळ्या
कंपूतला बावळट. ह्याचे नाव त्याच्या उंच आकृतीमुळे पडले आहे.
राजु
राजू हा कंपूतला गुंड मुलगा. हा ताकतवान आहे पण थोडा मंद. ह्याला विनोद पटकन कळत नाहित, जर तुम्ही हुशार असाल तर त्याच्या नकळत तुम्ही त्याच्यासमोर त्याच्यावर विनोद करुन सुटू शकता. पण जर त्याच्या लक्षात आल तर मात्र खैर नाही, तो चोप दिल्याशिवाय सोडणार नाही. चिंटू राजूची नेहमी चेष्टा करतो आणी भरपूर मार खातो.
जोशी काकू
चिंटूच्या शेजारी, यांच्या घरामध्ये एक बाग आहे. आजूबाजूच्या मुलांच्या खोड्यांचा यांना खुप त्रास होतो. जशेकी क्रिकेट खेळतांना फुटलेल्या काचा किंवा चोरिला गेलेल्या कैरया.
सोनूहा एक चिंटू च्या घराच्या बाजूला रहाणारा छोटा मुलगा आहे जो की नेहमीच काहीतरी खटपटी करण्यात गुंतलेला असतो अणि मग न जमेनासे झाले की रडतो तेंव्हा त्याचे सर्व मोठी मित्र मैत्रिणी त्याला मदत करतात .अणि सोनू कम्पू मधील एक मुलगा आहे ज्याच्या शर्ट ला नेहमीच लावलेला रुमाल असतो.
बंटी
बंटी हा बगल्याचा पलिव कुत्रा आहे .
नेहा
ही कम्पुतली अजुन एक मुलगी जी की फार कमी खेलायाला येतेसतीश दादा
चिंटू चा शेजारी .खुपच फिल्मी टाइप चा मुलगा आहे .


Jun 13, 2009
आयुर्वेद
src="http://pagead2.googlesyndication.com/pagead/show_ads.js">






